लातूर जिल्हा परिषदेत ई- टपाल सेवेचा जि.प.अध्यक्ष राहूल केंद्रे यांच्या हस्ते शुभारंभ



लातूर जिल्हा प्रतिनिधी राहुल शिवणे
प्रजासत्ताक दिनानिमित्त लातूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत सर्वच विभागातंर्गत ई-टपाल सेवेची सुविधा उपलब्ध होणार असून या प्रणालीचा शुभारंभ लातूर जि.प. चे अध्यक्ष राहूल केंद्रे यांनी केला.
ई-टपाल सेवेत सर्व विभागात येणा-या अर्जांचा, निवेदनांचा तसेच सर्व पत्रांचा तातडीने निपटारा होणार असून कोणत्याही परिस्थितीत प्रकरणे प्रलंबित रहाणार नाहीत तसेच प्ररकणाचा निपटारा होण्यासही कमी कालावधी लागणार आहे या प्रणालीचे नियत्रंण मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे असल्याने जिल्हा परिषदेच्या  सर्वच विभागातील प्रशासकीय कामाकाजाला गती मिळणार आहे या प्रणालीचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आझादी का अमृक महोत्सव या विविध नाविन्यपुर्ण उपक्रमा अंतर्गत केले गेले या शुभारंभा प्रसंगी मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल जि.प.उपाध्यक्ष भारतबाई सांळुके,कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंद चिलकुरे, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई राठोड, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, सर्व विभाग प्रमूख तसेच सामान्य प्रशासन विभागाचे मसलगे व्ही.व्ही, रामकृष्ण फड, मनिषा चामे उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने