अज्ञात वाहनाच्या धडकेत 6 वर्षीय चिमुरडीचा जागीच मृत्यू



शिरपूर - भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत 6 वर्षीय चिमुरडीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दि 29 रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्ग ते थाळनेर रस्त्यावर पाल्लवी हॉटेलच्या पुढे एका अज्ञात भरधाव वाहनाने आलीया दगडू तडवी रा. आभोडा तालुका रावेर या 6 वर्षीय चिमुरडीला जोराने धडक दिल्याची घटना आज दि 29 रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास घडली. यात आलीया हिचा जागिच मृत्यू झाला आहे. हॉटेल पाल्लवीच्या पुढे पपई तोडणी करणारे रावेर तालुक्यातील मजूर कुटुंब राहतात. मयत आलीया ही रस्त्याच्याकडेला असतांना थाळनेरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वाहनाने आलीया या चिमुरडीला चिरडल्याची घटना घडली. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत मयत आलीया हिला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने