पुणे इंदापूर तालुक्यातील काझड येथील खुनाच्या घटनेतील आरोपी अमित पांडुरंग नरूटे यास बुधवारी दि.05 जानेवारी रोजी पुण्यातील खडकी रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली. रविवारपासून पोलीस अमितच्या मागावर होते.तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलीला सोबत घेऊन आरोपी अमित पसार झाला होता त्यामुळे पोलीस या तपासामध्ये बारकाईने तपास करत होते.
पुण्याचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगरचे सहायक निरीक्षक बिराप्पा लातुरे यांचे पथक तसेच पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक हा तपास करत होते. दरम्यान वालचंदनगर चे सहाय्यक निरीक्षक बीराप्पा लातुरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अमित ला ताब्यात घेण्यात आले असल्याचे सांगितले.
दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये अमित नरूटे याने त्याच्या तीन वर्षाच्या मुलीला कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील कलबुर्गी येथील शासकीय अनाथालयात ठेवल्याचे निष्पन्न झाले, तर तेथून अमित हा ठाण्याकडे गेला. ठाण्यावरून तो इतरत्र पळून जात असताना खडकी रेल्वे स्थानकावर त्याला पोलीस पथकाने ताब्यात घेतले अशी माहिती मिळाली.दरम्यान त्यांनी हा खून का केला त्याच्या मागची कारणे काय आहेत हे पोलिस तपासात उघड होणार आहे.
Tags
news
