आनंदनगर येथील अपघातग्रस्त कुटुंबाची राजवर्धन पाटील यांनी घेतली भेट प्रतिनिधी दत्ता पारेकर



 
  पुणे: वालचंदनगर जंक्शन रस्त्यावर झालेल्या अपघातात आनंदनगर येथील घनश्याम देवकीनंदन भाटिया व आशा घनश्‍याम भाटिया या पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची दुखद घटना घडली आहे.हे दोघे पती-पत्नी वालचंदनगरहून जंक्शनकडे येत असताना त्यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरची धडक बसून या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी आनंदनगर येथील त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन या कुटुंबाचे सांत्वन केले.
    झालेला अपघात गंभीर असून यात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने भाटिया कुटुंबीयांची न भरून निघणारी हानी झाली आहे. कुटुंबावर मोठे संकट निर्माण झाले आहे. भाटिया कुटुंबीयांना दुःखातून सावरण्याची परमेश्वराने त्यांना शक्ती देवो अशी प्रार्थना यावेळी राजवर्धन पाटील यांनी केली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने