शिरपूरला मद्याची अवैध बाहतुक करणाऱ्याला कारसह अटक पोनि रविंद्र देशमुख यांची कामगिरी





शिरपूर -  शहरातून मद्याची अवैध वाहतूक करतांना पोलिसांनी मारुती स्विफ्ट कारसह एकाला अटक केली आहे. त्याच्या कडून एकूण पाच लाख २१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिरपूर शहरातून मद्याची वाहतूक सुरु असल्याची माहिती शिरपूर शहर पोलिस •ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशावरून दि. २२ रोजी सायंकाळी सातपासून शहरातील गुजराथी कॉम्प्लेक्स परिसरात वाहनांची तपासणी सुरु केली होती. त्यात शिरपूर फाट्याकडे जाणाऱ्या कार (एमएच १८, एजे ०८१५) चा संशय आल्याने पोलिसांनी चालकाला थांबवले. त्याने

उडवाउडवीची उत्तरे दिल्याने कारची झडती घेण्यात आली. त्यात सात हजार २५० रुपये पोलिसांनी किंमतीच्या इंपिरिअल ब्ल्यू व्हिस्कीच्या प्रत्येकी दोन लीटरच्या एकूण पाच बाटल्या, सात हजार २०० रुपयांच्या ओ.सी. ओ. सी. ब्ल्यू व्हिस्कीच्या ४८ बाटल्या, सहा हजार ९६० रुपये किंमतीच्या डीएसपी ब्लॅक व्हिस्कीच्या ४८ बाटल्या असा मद्यसाठा आढळला आला होता. कार सह मद्यसाठ्याची एकूण किंमत पाच लाख २१ हजार ४१० रुपये आहे. मद्याची अवैध वाहतूक केल्याने चालक किशोर शामराव पाटील (वय ४१, रा. पिंप्राळा, • नरडाणा ता शिंदखेडा जि धुळे) याला अटक करण्यात आली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने