शिरपूर शहरातील मच्छीबाजार भागात राहणारा विजय गोविंदा शिरसाठ हा रात्री एक वाजेच्या सुमारास सराफ बाजाराच्या अंधारात संशयित रित्या लपून बसल्याचे गस्त घालणाऱ्या पोलिसांना आढळून आला. त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तो चोरीच्या उद्देशाने या ठिकाणी लपून बसला होता असा पोलिसांना संशय आहे. त्याच्याविरुद्ध शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags
news
