धुळे -बनावट कोविड लसीकरण प्रकरणात पोलिसांकडून या प्रकरणात अजून कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे. त्यादृष्टीने आज कागदपत्राची तपासणी व संबंधितांनी आतापर्यंत दिलेल्या जबाबातून काही धोगेदोरे हाती लागतात का? याचा तपास पोलिसांकडून करण्यात आला. दिवसभरात केवळ कागदपत्राची तपासणी करण्यात आल्याची माहिती तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच यातील लसीकरणाप्रकरणी अन्य काही जणांच्या शोधासाठी मुंबईत गेलेले पथक अद्यापही परत आलेले नाही. बनावट वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सहा जणांना जामीन मिळाला आहे. त्यात इतरांचाही सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणाचे धागेदोरे अन्य जिल्ह्यातही असून शकतात अशी शंका आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास करतांना सर्व बारकावे तपासणी पाहिले जात आहेत. त्यासाठी उपायुक्तांसह काहींना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. मात्र वैद्यकीय कारणासह ते हजर झालेले नाहीत. तसेच याप्रकरणी लोकप्रतिनिधीसह बाहेरील काही जणांचा सहभाग असल्याचे आढळून आले असून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. तर लस घेतलेल्यांकडूनही याबाबतची माहिती मिळविण्याचा प्रयत्न आहे. तसेच काहींचे जबाबही आतापर्यंत नोंदवले गेले आहेत. त्यादृष्टीने पोलिसांकडून याप्रकरणाशी संबंधित कागदपत्रातीच तपासणी करून त्यातून काही धागेदोरे हाती लागतात का? हे तपासण्यात आले तर तपासासाठी दोन पथक बाहेरगावी गेले होते. त्यापैकी एक पथक शहादा येथून रिकाम्या हाताने परत आले आहे. तर एक पथक अद्यापही मुंबईतच थांबून आहे. मात्र संबंधित लोकप्रतिनिधीचे मोबाईल लोकेशन दाखविल्याचे सांगितले जात असले तरी प्रकरणात नाव पुढे आल्यापासून त्याचा मोबाईल सीचऑप येत आहे.I
Tags
news
