शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे घरात प्रवेश करून रोख रक्कम चोरतांना दोघा चोरांना पकडण्यात आले. याप्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पळसनेर गावात मेन रोडवर असलेल्या मयुर प्रेमसिंग गिरासे यांच्या घरातून भूषण संजय सोनार व ललित गोवर्धन मातंग (रा शिरपूर) हे दोन्ही 29 हजार 740 रुपये चोरून घेऊन जात होते. हा प्रकार लक्षात आल्याने त्यांना पकडण्यात आले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Tags
news
