शिरपूर तालुक्यातील मांजरोद शिवारात बिबट्याने पाळीव प्राण्याची शिकार केल्याची घटना घडली आहे. मांजरोद येथील शेतकरी गुरुदास आनंदा पाटील यांच्या शेतात बिबट्याने गाईच्या वासरा वर हल्ला करून त्यास ठार केले. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने परिसरातील शेतकरी चिंतित आहेत. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. यावेळी वनविभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.
Tags
news
