शिरपूर येथे विद्यार्थिनींसाठी स्व-संरक्षण जागृती कार्यक्रम






शिरपूर: येथील आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च ॲण्ड डेव्हल्पमेंटच्या युवती सभे अतंर्गत प्रथम वर्ष प्रवेशीत विद्यार्थिनींसाठी ' स्व - संरक्षण जागृती ' कार्यक्रम झाला. महाविद्यालयीन रॅगींग, सोशल मेडीया आणि गुन्हे या विषयावर व्याख्यानाचे आयोजन परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस. एम. पटेल सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी शिरपूर पोलिस ठाण्याच्या उपनिरिक्षक छाया पाटील, पोलिस नाईक पौर्णिमा पाटील, परिसंस्थेचे सहा. संचालक प्रा. मनोज बेहेरे, आय. क्यु. ए. सी. को- ऑर्डीनेटर डॉ. मनोज पटेल, पदवी विभागप्रमुख प्रा. तुषार पटेल, परिसंस्थेच्या रजिस्ट्रार वैशाली गोरले आदी उपस्थित होते. उपनिरिक्षक छाया पाटील यांनी आपल्या भाषणात विद्यार्थिनींचे प्रश्न, सुरक्षित कसे रहावे आणि विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाबाबत प्रबोधन केले. त्यांनी रॅगिंग, कौटुंबिक हिंसाचार, गैरवापर या विषयांवर प्रकाश टाकला. महिला सक्षमीकरणाची गरज, महिलांचा आत्मविश्वास वाढावा, अन्यायाविरुध्द लढण्याची हिंमत यावी, कायदे विषयक माहिती देणे या उद्दिष्टाणे या सत्राचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे मुलींच्या मनातील भिती नाहिशी झाली व कायद्याने दिलेले संरक्षण याबद्दल विशेष ज्ञान प्राप्त झाल्याचेही सहभागी विद्यार्थिनींनी आपल्या अभिप्रायात स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवती सभेचे कार्यकारी अधिकारी प्रा. छाया पाटील, प्रा. रोहिणी पाटील, प्रा. प्रियंका सैंदाणे, प्रा. अमुल तांबोळी, प्रा. अमित पाटील, धिरज शेटे, दिपक बोरसे, डी. यु. चौधरी, विशाल माहेश्वरी यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचलन प्रा. अर्चना जडे यांनी केले. या व्याख्यानाच्या लाभ प्रथम वर्षाच्या १९४ विद्यार्थीनी आणि १३ कर्मचारी असे एकूण २०७ जणांनी घेतला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने