औरंगाबाद - मा. पोलीस महासंचालक सोम. रा. मुंबई यांचे कडून संपूर्ण महाराष्ट्रात अवैध अग्नीशस्त्र कारवाई बाबत दि. 23/01/2022 रोजी पासुन मोहीम चालू असल्याने त्या आदेशान्वये दि. 24-01 2022 रोजी सपोनि श्री खटाणे तसेच विशेष पथकाचे अमलदार असे हद्दीत पायो पेट्रोलींग करत असतांना त्यांना गुप्तवातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमी प्रमाणे त्यांना न्यु हनुमान नगर ग.न.05 येथे तिन इसम हे स्वता जवळ गैरकायदेशीर पणे पिस्टल वाळगुन सदर ठिकाणी येणार आहे अशो माहिती मिळाल्याने त्यांनी मा. पोलीस निरीक्षक श्री दिलीप गांगुर्डे यांना माहिती देऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले व त्यांचेवर सापळा लावुन विशेष पथकाचे सपोनि श्री खटाणे व त्यांचे सोबतने स्टॉफने न्यु हनुमाननगर न.05 शिव किराणा दुकाना जवळ सापळा रचुन बातमी प्रमाणे इसम दिसुन आल्याने त्यांचेवर छापा कारवाई केली असता सदर इसम तेथुन पोलीसांना पाहून तेथुन पळुन जाऊ लागल्याने त्यांचा थोड्या अंतरावर पाठलाग करुन त्यातील दोन इसम नाम ) हितेन्द्र नवनाथ वाघमारे वय 24 वर्षे रा. गजानननगर ग.न.03 औरंगाबाद 2) अनिकेत रावसाहेब वडमारे वय 26 वर्ष रा. हिरापुर ता. गेवराई जि.बिड यांना ताब्यात घेतले त्यातील हितेन्द्र नवनाथ वाघमारे याचे कमरेला खवलेली एक गावटी बनावटीची पिस्टल व एक जिवंत काडतुस त्याचे कडे मिळून आल्याने ते जप्त केले तसेच आरोपीतांच्या ताब्यातून दोन मोबाईल एक मो.सा. असा 1 लाख 3 हजार रुपयेचा ऐवज जप्त करण्यात आला. तसेच त्यांचे सोबतचा मोक्यावरून फरार झालेला तिसरा आरोपी ओम राजु कायंदे वय 22 वर्षे रा हनुमानगर औरंगाबाद याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले सदरचे आरोपी हे पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार असुन आरोपी हितेन्द्र वाघमारे व अनिकेत बड़मारे यांचे विरुध्द खून प्रयत्न जबरी चोरो दुखापत, दरोडा तयारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदर इसम स्वताजवळ गावटी पिस्टल बाळगतांना मिळुन आल्याने पोलोस नाईक बाळाराम चोरे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन पो.स्टे. पुंडलिकनगर गु.र.न. 33/2022 कलम 3/25 भा.ह.का प्रमाणे दि.25 01 2022 राजो दाखल करण्यात आला आहे सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि श्री गणेश माने करत आहेत.
. सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त डॉ. श्री. निखील गुप्ता सर, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ -श्री. दिपक गि-हे साहेब, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (उस्मानपुरा विभाग) श्री विशाल तुमे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दिलीप गांगुर्डे पोलीस निरीक्षक पो.स्टे. पुंडलिकनगर, सपोनि श्री शेषराव खटाणं, पोउपनि श्री विठ्ठल धांडक .स.फो. रमेश सांगळे, पोह/ धर्मा जाधव, पोना बाळाराम चोरे ,पोना जालीदर मान्टे, पोना गणेश डोईफोडे पोना वैराळकर, पोना जगदीश चव्हाण, पोकों/ कल्याण निकम ,पोकों राजेश यदमळ, पोको प्रविण मुळे केली आहे.
Tags
news
