सांगवीलगत बोराडी फाट्यावर ट्रकची दुचाकींला मागून जोरदार धडक,सलाईपाडा येथील दुचाकीस्वार एक मयत तर गंभीर जखमी तालुका पोलीस ठाण्यात अपघात नोंद





मुंबई आग्रा महामार्गावर तालुक्यातील सांगवी लगत बोराडी फाट्यावर सोमवारी सायंकाळी भरधाव ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला.या अपघातात दुचाकीवरील एक मयत झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे.नाखड्या सीताराम पावरा वय 26 रा.सलाईपाडा ता शिरपूर असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून विरसिंग रतन पावरा वय 28 हा गंभीर जखमी झाला असून त्याचेवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
          तालुक्यातील सलाईपाडा येथील नाखड्या सीताराम पावरा व विरसिंग रतन पावरा हे एमपी 10 एफ 6949 क्रमांकाच्या मोटारसायकलने सांगवी कडून बोराडीकडे जात असताना बोराडी फाट्यावर इंदोर कडून मुंबई कडे भरधाव वेगात जाणाऱ्या आर जे 14 जीएल  0297 क्रमांकाच्या कंटेनर ट्रकने मोटारसायकल ला मागून जोरदार धडक दिली या धडकेत नाखड्या पावरा हा जागीच मयत झाला तर विरसिंग पावरा हा गंभीर जखमी झाला.अपघातानंतर नागरीक तालुका पोलिसांनी धाव घेत अम्ब्युलन्स ने उपजिल्हा रुग्णालयात दोघांना दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.डॉ हिरेन पवार यांनी तपासणी करून नाखड्या पावरा यास मयत घोषित केले. व विरसिंग पावरा याच्यावर तात्काळ उपचार सुरू केले.याप्रकरणी वार्डबॉय नितेश गवळी यांनी तालुका पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृची नोंद करण्यात आली.घटनास्थळी व रुग्णालयात पोहेकॉ संजय धनगर यांनी पंचनामा वैगरे करून पुढील कारवाई करीत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने