चांदवड: शहरात मध्यवर्ती कार्यालय शिवनेरी चौक येथे बाळासाहेब ठाकरे जयंती मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली. यानिमित्ताने नामदार एकनाथ शिंदे (नगरविकास मंत्री) याचे PRO स्वीय सहाय्यक श्री नितिन लानसे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना त्यांनी मार्गदर्शन केले येणाऱ्या सर्व प्रकारच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवल्या शिवाय राहणार नाही असा निर्धार त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले व तालुक्यातील गाव तेथे शाखा पोहचवा असे उपदेश त्यांनी यावेळी तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना दिला.
उपजिल्हा प्रमुख नितीन आहेर, शहर प्रमुख संदीप उगले, उप शहर प्रमुख दीपक शिरसाठ, चांदवड मर्चंट बँकेचे संचालक सचिन खैरनार, मुकेश आहेर, विष्णू कोतवाल, अँड. विनायक हांडंगे, अँड. विशाल व्यव्हारे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते
Tags
news
