शिरपूर तालुक्यातील भोरटेक गावात वीज वाहिनीवर आकाडा टाकून वीज चोरी करण्यात आली. या प्रकरणी थाळनेर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. भोरटेक येथे वीज चोरी केली जात होती. याविषयी माहिती मिळाल्यानंतर पथकाने छापा टाकला. या प्रकरणी छगन दर्शन पाटील, भाईदास एकनाथ पाटील, विक्रम तुलसीराम पाटील,
नामदेव दत्तात्रय जाधव, रोहीदास एकनाथ पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Tags
news
