तालुक्यातील जुनी सांगवी गावात दि. १२ जानेवारी २०२२ रोजी तसेच १३ जानेवारी २०२२ रोजी झेंडेअंजन, वकवाड, नवी बोराडी येथे गोरगरीब व गरजू व्यक्तींना एकूण ५०० ब्लॅंकेट्स मोफत वाटप तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दहिवद मानव केंद्राचे सेवेदार देखील उपस्थित होते.
विश्व मानव रूहानी केंद्र नोंदणीकृत हे लाभकारी, निरपेक्ष परोपकारी आणि एक आध्यात्मिक संस्था आहे. जी जात-धर्म व कुठलाही भेदभाव न मानता नेहमी समाजसेवेचे कार्यकर्ते करत राहते. संस्थेचे मुख्यालय मु. नवानगर पो. नानकपूर ता. कालका जिल्हा पंचकुला हरियाणा येथे स्थित आहे. संस्थेद्वारे मानवतेच्या सेवेसाठी नेहमी कार्य केले जाते.
दहिवद येथील विश्व मानव रहाणी केंद्राचे प्रमुख तसेच शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येऊन गोरगरीब व गरजूंना मदत करण्यात येते.
Tags
news
