धुळे, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी मुकेश कांबळे, नायब तहसीलदार पंकज पाटील, चंद्रकांत शिंपी, स्वागताधिकारी अभय कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Tags
news
