शिरपूर- मुंबई येथील सृजन अभिनय कार्यशाळा येथील मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रद्ध अभिनेते, लेखक, निर्मात श्री राजेश देशपांडे सर (नाटक, चित्रपट, मालिका) अशा अनेक नाटकांचे लेखक व दिग्दर्शक राजेश सर यांच्याकडे शिरपूर येथील युवक सुनिल सोनार यांनी अभिनय मार्गदर्शन घेतले. राजेश देशपांडे यांची नाटके हिमालयाची सावली, गंगूबाई नॉनमॅटॉक, करून गेला घाव, जाऊबाई जोरात, मराठी चित्रपट धुडगुस तसेच नाटक धनंजय माने ईथेच राहतात. चित्रपट पांडू तसेच मालिका झेप यांचे लेखन केले आहे. तसेच मराठी सृष्टीतील मानवंत दिग्गज अभिनेते श्री. विजय पाटकर सर (चित्रपट, नवरा माझा नवसाचा, पोलिसाची बायको, धमाल, नवरा मुंबईचा) यावैतिरीक्त अनेक चित्रपट मालिकेत आपल्या अभिनयाचे ठसे उमटविणारे विजय पाटकरसर यांचेही मार्गदर्शन लाभले, तसेच सोनी टिव्ही मराठी वरील शो मराष्ट्राची हास्य जत्रा या शो मधील हास्य अभिनेते व विनोदी लेखक श्री. समिर चौगुले सर यांनी स्किटलेखन व विनोदी अभिनय कसा करावा या विषयी मार्गदर्शन केले. मराठी चित्रपट सृष्टील आघाडीची नायीका अनेक मराठी चित्रपट केलेले सुप्रिद्ध अभिनेत्री व निर्माती निर्मितीताई सावंत, चित्रपट, नाटक, मालिका. (चित्रपट, खबरदार, गंगुबाई नॉनमॅट्रीक, चल धर पकड, सासू नंबरी जबाई दस नंबरी) या वैतिरिक्त अनेक नाटके (व्हॅक्युम क्लिनर, संजू छाया, मराठी चित्रपट झिम्मा) असे सुपहिट चित्रपट देवून आपल्या अभिनयाचा ठरा उमटविणारे यांनी आपले चित्रपट सृष्टीतील अनुभव कथन केले. व त्यांच्या हस्ते प्रसिस्ती पत्र देवून गौरविण्यात आले. सिने क्षेत्रातील सुप्रसिद्ध सिनेमेट्रो ग्राफर श्री. प्रसाद भेंडे (चित्रपट, दुनियादारी, मितवा, बॅबसिरीज, समांतर, नाटक, मालिका) असे अनेक चित्रपटांचे सिनेमॅट्रो ग्राफर यांनीही मार्गदर्शन केले. तसेच सिनेएडीटस् रोहन देशपांडे यांनी एडीटींगचे मार्गदर्शन केले. यावॆतिरिक्त मेकप आरटींस प्रकाश योजना (नैपथ्थ) या क्षेत्रातील कलाकारांनी देखील मार्गदर्शन केले. सुनिल सोनार यांनी याआदी चित्रपट क्षेत्रातील नामांकीत अभिनेत्री व अभिनेते यांची भेटघेवून अभिनय लेखन या विषयी त्यांचीशी हितगुज केले आहे. तसेच मुंबई फिल्म इंडस्ट्रितील निर्माते व सध्या चालू असलेली चेबसिरीज (सबका साई) मराठी चित्रपट गजर या चित्रपटाचे लेखक, दिगदर्शक श्री. अजित भैरवकर, मुंबई यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी भेट घूवन चित्रपट व मालिका यांची सखोल चर्चा केली. तसेच फिल्म क्षेत्रातील अनेक अभिनेते व अभिनेत्री त्यांच्या जुळलेले असल्यामुळे त्यांना अभिनय क्षेत्राकडे वाटचाल करण्याचा मार्ग मिळाला असून त्यांना मित्रपरीवार, समाजबांधव तसेच अनेकांकडून शुभेच्छाही मिळाल्या आहेत. त्यांनी शिरपूर येथे आलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मितीताई सावंत, शिरपूर येथील झी गौरव महोत्सव या प्रसंगा संबंधी अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्याशी शिरपूर येथील प्रसंगाची आठवन करून त्याबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला व शुभेच्छाही दिल्या. व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Tags
news
