धुळे तालुक्यातील कुंडाणे नजीक वेल्हाणे येथे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी निवडणुकीचे वारे वाहत आहे. याठिकाणी भाजपा चे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील विरुद्ध कुंडाणे वे च्या सरपंच श्रीमती मनीषा अनिल पाटील कैलास पवार तसेच त्यांच्यासोबत भाजपातून बंडखोरी करत भाजपा तालुका कोषाध्यक्ष कैलास जाधव मिळून या दोन गटांमध्ये चुरशीची लढत आहे. भाजपा तून बंडखोरी करत कैलास जाधव यांनी जवाहर ग्रुपच्या पॅनल मधुन उमेदवारी केली आहे. त्यात त्यांच्या पॅनल मधून सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी म्हणून असलेल्या आठ जागांपैकी देवेंद्र पाटील यांच्या पॅनलचे सात उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र अवैध झाल्याने जवाहर ग्रुपचे सात उमेदवार हे बिनविरोध निवड झाले होते परंतु देवेंद्र पाटील यांचा एकमेव अर्ज वैध झाल्याने त्यांची उमेदवारी कायम होती परंतु त्यांनी माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी ऐनवेळेस माघार घेतल्याने या निवडणुकीचे सर्व
चित्र बदल झाले व सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधींच्या आठ च्या आठ जागा जवाहर ग्रुप कडे मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी येलमामे यांनी या उमेदवारांना संचालक पदी बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केले त्यामुळे जवाहर ग्रुपमधील उमेदवारांनी तसेच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला यात कैलास जाधव, रामसिंग पवार, भरत पाटील, रमेश पाटील, मकरंद चव्हाण, हनुमान पवार, अशोक पाटील, ज्ञानेश्वर पाटील, हे बिनविरोध झाले. उर्वरित राखीव असलेल्या पाच जागांसाठी चुरशीची लढत मानली जात आहे. भाजपा तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील यांना त्यांच्याच गावात मोठा धक्का बसला आहे. परिवर्तन विकास पॅनलच्या उमेदवारांमधून चेअरमन पदाचे नाव जरी जाहीर झाले नसले परंतु ८ जागा जवाहर ग्रुपच्या बिनविरोध झाल्यामुळे चेअरमन जवाहर ग्रुपचा हे मात्र नक्की आहे. बिनविरोध निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना धुळे ग्रामीणचे आमदार बाबासाहेब कुणाल पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Tags
news
