शिरपूर : पुज्य भन्ते डी संघरक्षित महाथेरो उर्फ शाम बाबा यांचे निर्वाण ; कोडिद येथे करण्यात आले बौद्ध पध्दतीने अंतिम संस्कार*




शिरपूर तालुक्यातील कोडिद येथे दिनांक 11 जानेवारी 2022 रोजी पहाटे 6 वाजता पूज्य भन्ते डी संघरक्षित महाथेरो उर्फ शाम बाबा यांचे वयाच्या 87 व्यया वर्षी निर्वान काल कथित झाले. 
    शिरपूर तालुक्यातील कोडिद हे पूज्य भन्ते डी संघरक्षित महाथेरो उर्फ शाम बाबा यांचे मूळ गाव आहे त्यांचे ह्या गावात निर्वाण झाले. 
    पुज्य भन्ते डी संघरक्षित महाथेरो उर्फ शाम बाबा हे ब्रम्हचारी होते वयाचा 12 वर्षाचे असताना त्यानीं बौद्ध धम्म स्वीकारला व नागपूर दिक्षाभूमी येथे वास्तव्य केले 
    शाम बाबांनी बाहेर देशात जाऊन बुद्ध धम्माचा प्रचार वर प्रसार केला. 
   थायलंड, चीन, नेपाळ, श्रीलंका व इतर देशात जाऊन बुद्ध धम्माची दिक्षा दिली.  
     ते खान्देशातील एकमेव भिक्खू होते 
त्याची अंत यात्रा ( निर्वाण यात्रा ) 12 जानेवारी रोजी बौद्ध पद्धतीने त्रिसरण पंचशील म्हणत काढण्यात आली. शिरपूर तालुक्यातील कोडिद येथील अमर धाम येथे त्यांच्यावर बौद्ध पध्दतीने अंतिम संस्कार करण्यात आले. 
    यावेळी त्याचे शिष्य भन्ते आनंदजी, भिक्खूनी खेमा धम्मदीपा, धुळे येतील भिक्खू अमर ज्योती हे व गावातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने