रोटरी स्कूलमध्ये नववर्षानिमित्त उपक्रम दोडाईच (अख्तर शाह)




 दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये शाळेत  विदयार्थीसाठी स्वागत, परिसर व वर्गसजावट, ग्रिटींग कार्ड तयार करणे असे विविध उपक्रम घेण्यात आले. यादिनी शालेय परिसर व वर्ग रांगोळी,पानेफुले, फुगे, माहितीपर लेख, सुविचार व कलाकुसरीच्या वस्तूंनी  सजवून विद्यार्थ्यांचे नववर्षारंभी स्वागत करण्यात आले. 
विद्यार्थ्यांनीही  पालक, मित्र व शिक्षकांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या साहित्याचा वापर करून सुखमय,आनंददायी, आरोग्यदायी व यशस्वी जीवनासाठी शुभेच्छापर संदेश देणारे उत्कृष्ट ग्रिटिंग कार्ड तयार केले.या कार्डमधून  विदयार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कौशल्याचा आविष्कार दिसून आला.         
या आनंदमयी, संगीतमय वातावरणामुळे सर्व विद्यार्थ्यांचा चेहरा उजळून निघाला होता.    
कार्यक्रमास अध्यक्ष श्री हिमांशू शाह व प्राचार्य श्री एम.पी. पवार यांनी मार्गदर्शन केले तसेच यशस्वितेसाठी श्री गोपाल ढोले,सौ.शितल पाटील, सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात आले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने