शिरपूर- पंचायत समिती शिरपूर तसेच धुळे चाइल्डलाईन, युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ याबाबत प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. शिरपूर येथील पंचायत समितीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी वाय. डी. शिंदे तर प्रमुख मार्गदर्शक पाहुणे म्हणून सप्तशृंगी बहुद्देशीय महिला संस्थेच्या अध्यक्षा तथा बालकल्याण समिती सदस्या मीना भोसले होत्या. यावेळी मिना भोसले म्हणाल्या की, ' बालविवाह प्रतिबंध कायदा 1 हा महत्त्वाचा आणि मुलींना संरक्षण देणारा कायदा आहे. अल्पवयीन बालविवाह ठरविणे गुन्हा ठरतो. विवाह करणारी सज्ञान व्यक्ती, लग्न ठरवणारे, पार पाडणारे, हजर असलेले सर्वजण या कायद्यानुसार गुन्हेगार आहेत. बहुतांश बालविवाहांत वधू अल्पवयीन असते. कुमारवयीन आकर्षणामुळे झालेला बालविवाह व लादलेला बालविवाह यांतील फरक ओळखून, प्रत्येक प्रकरण संवेदनशीलतेने हाताळणे गरजेचे आहे. मुलीला आयुष्यात पुन्हा उभे करण्यासाठी सर्व मदत देणे गरजेचे असते. त्यात वैद्यकीय उपचार, समुपदेशन, प्रशिक्षण यांचा समावेश आहे. बालविवाहाचे तिच्या आरोग्यावर काय परिणाम होतात, गर्भारपण, प्रसूती याचा तिच्यावर, मुलावर काय परिणाम होऊ शकतो, याची माहिती मीना भोसले यांनी दिली. युनिसेफचे जिल्हा प्रकल्प समन्वयक नंदू जाधव यांनी बालविवाह निर्मूलन कायदा, पितृसत्ता पद्धत, लिंगभाव, समानता याविषयी माहिती दिली. बालविवाह होत असल्याची माहिती प्राप्त झाल्यास त्वरित चाईल्डलाईनला १०९८ या टोल फ्री क्रमांकावर कळवावे, असे आवाहन धुळे चाईल्डलाईन प्रकल्पाचे समन्वयक अजय ताकटे यांनी केले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमास सहाय्यक गटविकास अधिकारी
अधिकारी आर. झेड. मोरे, विस्तार अधिकारी एस.एस. पवार, आर. जी. पावरा तसेच परिसराचे सरपंच,प्रकल्प सदस्य सुखलाल गायकवाड, जगदीश ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी, चाईल्डलाईन जगताप, ज्योती परदेशी, लिंक वर्कर प्रकल्पाचे सुपरवायझर झेलर पावरा, लिंक वर्कर प्रशांत पा निखिल बिऱ्हाडे, मनोज भोई आदी उपस्थित होते.
Tags
news
