रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे पाटील यांचाकडे मागणी मनमाड इंदौर रेल्वे मार्गाचा कामास सुरुवात व्हावी : भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी






शिरपूर : बहप्रतिक्षीत मनमाड- धुळे- इंदौर रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाने चार पाच वर्षापुर्वी मंजुरी दिली असून, अर्थसंकल्पात या मार्गाचा नवीन रेल्वे मार्ग म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यावेळी देशात सुरू करण्यात येत असलेल्या ४४ नव्या रेल्वे प्रकल्पांमध्ये मनमाड इंदौर मार्गचा समाविष्ट झाला आहे. मात्र अद्याप रेल्वे मार्गचा कामाला सुरुवात झाली नसुन या रेल्वे मार्गाच्या कामाला गती द्यावी अशी मागणी रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे पाटील यांचाकडे धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी (दि.२ जानेवारी ) रोजी निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या पन्नास वर्षापेक्षाही अधिक काळापासून रखडलेल्या मनमाड- मालेगांव- धुळे शिरपुर- इंदौर नवीन रेल्वे मार्ग व्हावा यासाठी आम्ही अनेक आंदोलनांत सहभाग घेतला असुन आपल्या केंद्र सरकारने या नवीन रेल्वे मार्गाचा आठव्या क्रमांकावर मनमाड इंदौर रेल्वे मार्गाचा उल्लेख केला आहे. धुळे जिल्हासह उत्तर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला गती देऊ शकणार्‍या मनमाड- इंदूर रेल्वे मार्गाचे काम मार्गी लागण्यासाठी आपल्या केंद्र सरकारने सन २०१७-२०१८ च्या अर्थसंकल्पात रेल्वे मंत्रालयाने प्रामुख्याने पूर्ण करण्याच्या मार्गामध्ये मनमाड- मालेगाव- धुळे- इंदौर या रेल्वे मार्गाचा समावेश केला आहे. मात्र अद्याप या मार्गाच्या कामाला सुरुवात झाली नसुन मनमाड- मालेगाव- धुळे- शिरपूर- इंदौर रेल्वे मार्ग साकारण्यासाठी, पुर्णत्वासाठी व रेल्वेमार्ग लवकरात लवकर सुरु होण्यासाठी आपण लक्ष घालावे अशी मागणी रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे पाटील यांचाकडे धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने