भारतीय बौद्ध महासभा , जिल्हा स्तरिय बैठक उत्साहात संपन्न. नाशिक शहर अध्यक्ष पदी भाऊसाहेब गायकवाड यांची नियुक्ती, नाशिक शांताराम दुनबळे.




                     नाशिक=भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या आदेशानुसार नाशिक जिल्हा स्तरीय बैठक महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष दिनेश हनुमंते, राज्य कोषाध्यक्ष डॉ रमेश तायडे, राज्य सचिव राजेश मोरे , राज्य संघटक वैभव धबडगे , नाशिक विभागीय अध्यक्ष अशोक पटाईत यांच्या उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथे जिल्हा अध्यक्ष शरदभाऊ केदारे यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली.                         यावेळी नाशिक जिल्हा कोषाध्यक्ष पदी अनिल भाऊ गायकवाड, नाशिक शहर महिला अध्यक्ष ज्योतीका   ताई वसंत पवार,तर नाशिक शहर अध्यक्ष म्हणून भाऊ साहेब दामु गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.उपस्थित भारतीय बौद्ध महासभा जिल्हा व शहर कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने