बेस्ट वैश्य वाणी समाजाचा १५वा वर्धापन दिन संपन्न..!



मुंबई-परेल प्रतिनिधी
परेल येथील बेस्ट वसाहतीमधील वेश्यवाणी समाज मंडळाचा पंधरावा वर्धापन दिन समारंभ श्री. दिगंबर पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली बेस्ट हॉलमध्ये मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. प्रास्ताविक भाषण समाजाचे सरचिटणीस श्री. संतोष कोलगे यांनी करून समाजाच्या १५ व्या वर्षांच्या कार्याचा अहवाल सादर केला. याप्रसंगी जेष्ठ समाजसेवक श्री. राजेंद्र लकश्री यांचा ५० वर्षाच्या कार्याचा गौरव म्हणून समाजरत्नभूषण पुरस्कार, सन्मान पत्र, शाल, श्रीफळ व गुच्छ देवून यथोचित सत्कार, तसेच सिने नाट्य - दूरदर्शन मालिकेचे कलावंत, दिग्दर्शक व पत्रकार श्री. महेश्वर तेटांबे यांना समाजभूषण पुरस्कार, सह शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन त्यांचाही सत्कार या प्रसंगी करण्यात आला. या समाजातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी प्रगती करून उत्तीर्ण झाल्याबद्दल कु. रिया राजेश वंजारे, कु.श्रध्दा बेर्डे, कु. यश नामदेव नारकर, तसेच कुमारी श्रावणी नामदेव नारकर यांना स्मृतीचिन्ह देवून त्यांच्या गौरव करण्यात आला. तर बेस्ट मधून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी व त्यांच्या सुविज्ञ पत्नी सर्वश्री दिगंबर पाटणकर, श्री. नामदेव नारकर, श्री. प्रदीप नारकर, श्री. जयवंत साठे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व गुच्छ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री. अमृत रावराणे, श्री. एकनाथ सणस, श्री. राजेंद्र मुंबरकर, श्री. अवधूत हरयाण, श्री. प्रशांत पिळणकर, श्री. संजय कापडी, श्री. महेंद्र बेर्डे, श्री. विलास वारंगे, श्री. दत्ताराम वंजारे, श्री. राजेश्वर जोगू व श्री. हेमंत अनुमाला यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. शेवटी महिला मंडळाचा हळदी कुंकू समारंभ सौ. निकीता बेर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी सौ. दर्शना पाटणकर, स्मिता कोलगे इत्यादिची मार्गदर्शन पर भाषणे झाली. कार्यक्रमाच्या शेवटी 
सरचिटणीस श्री. संतोष कोलगे यांनी उपस्थित मान्यवरांचे तसेच वैश्यवाणी संघाचे कार्यकर्ते यांचे आभार मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने