*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा अध्यक्ष . संदीप दादा बेडसे यांचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांना निवेदन.*
दोडाईचा (अख्तर शाह)
वाडी शेवाडी मध्यम प्रकल्प तालुका.शिंदखेडा जि.धुळे च्या बुडीत क्षेत्रामध्ये अस्तित्वातील चिमठाणे - दुसाने रस्त्याचा (राज्यमार्ग क्र.११) ४.२० किमी.भाग जातो. या रस्त्यासाठी पर्यायी वळण रस्ता म्हणून देगाव-सतारे - देवी या ६.१७ किमी. रस्त्याचे कामासाठी ३० मीटर रुंदीचे जमीन क्षेत्र संपादन करावयाचे होते. पैकी अस्तित्वातील १२.०० मीटर लांबीचा रस्ता अस्तित्वात होता. उर्वरित १८ मीटर लांबीचे क्षेत्र रस्त्याचे डाव्या व उजव्या बाजूस प्रत्येकी ९.०० मीटर क्षेत्राचा भूसंपादन प्रस्ताव क्र. ४२/२००७ हा मंजूर होता. त्यांची संयुक्त मोजणी सन २००७/०८ मध्ये पूर्ण करण्यात आली होती.
तथापि संयुक्त मोजणीतील त्रुटी/दुरुस्ती कामी कार्यवाहीत असताना सन २०१३ मध्ये नवीन भूसंपादन कायदा २०१३ लागू झाला. सदर कायदा लागू झाल्याने भूसंपादन प्रस्ताव क्र.४२/२००७ हा आपोआप व्यपगत रद्द झाला. सदर रस्त्यासाठी आवश्यक क्षेत्राचा नवीन कायद्यानुसार भूसंपादन प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी कार्यालयास सादर झाला आहे. सदरील प्रस्ताव लवकरात लवकर मान्य झाल्यास त्या परिसरातील शेतकरी बांधवांना त्याचा योग्य तो मोबदला मिळुन फायदा होणार असून रस्त्याचे रखडलेले काम त्वरित पूर्ण होऊन दळणवळणाच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत सोयीचे होणार आहे.
Tags
news