युवकाची तापी नदीत उडी घेत आत्महत्या आईने रागावल्या च्या मनस्ताप करत दुर्दैवी घटना






शिरपूर - काम धंदा करीत नसल्यामुळे आईने रागावल्याने शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी येथील २५ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. सदर तरुणाचा मृतदेह तापी नदी पात्रात गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास पाण्यावर तरगतांना आढळून आला आहे. विनोद सुरेश परदेशी ( २५ ) रा. तऱ्हाडी असे मृतदेह आढळून आलेल्या तरुणाचे नाव आहे. याअगोदर शहर पोलीस ठाण्यात सदर तरुण २२ जानेवारीपासून बेपत्ता असल्याची तक्रार मोठ्या भावाने दाखल केली होती. त्याचा पोलिसांकडून शोध घेणे सुरू होते. दरम्यान, दि. २७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास गिधाडेलगत तापी नदी पात्रात एक अनोळखी मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने नागरिकांनी गर्दी केली होती. मृतदेहाबाबत शिंदखेडा व शिरपूर शहर पोलीस ठाण्यात खबर देण्यात आल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तपासांअती दर मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर सदरचा मृतदेह हा बेपत्ता असलेल्या तहाडी गावातील विनोद परदेशी या २५ वर्षीय तरुणाचा असल्याची ओळख केल्यानंतर सदर मृतदेह शिरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतला. पुढील कारवाई शहर पोलिसांकडून सुरू आहे. काम धंदा करीत नसल्याने आई रागावल्याने विनोद परदेशी हा २२ जानेवारी पासून घरातून निघून गेला होता. त्याच्या पश्चात आई, भाऊ असा एकत्र परिवार असून गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने