अ.भा.म.चि.निर्माता महामंडळाच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांच्या पुर्ततेबाबत नाना पटोले यांची घेतली भेट..!



आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.आ.श्री. नाना पटोले साहेब यांनी शिफारस केलेल्या आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्याबाबत महत्वाची बैठक महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी, टिळक भवन, दादर येथे आयोजीत केली होती. 
या बैठकीत महाराष्ट्रप्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार श्री.नानाभाऊ पटोले यांनी मराठी चित्रपट वाहिनीवरील अन्य भाषेतील मराठी डब चित्रपटाचे प्रदर्शन तात्काळ थांबविले जावे आणि यांसाठी मी स्वतः जातीने लक्ष घालून येणार्‍या महाराष्ट्र अधिवेशनात हा प्रश्न मांडून कायद्याच्या चौकटीत तो धसास लावून मराठी कलावंताना न्याय देण्याचे काम करणार असल्याचे ठोस आश्वसान दिले. त्याचबरोबर नाना पटोले यांनी आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या मागण्यांचा आढावा घेऊन शासनदरबारी त्याची लवकरात लवकर पूर्तता केली जाईल असे देखिल आश्वासन दिले. याप्रसंगी श्री.देवेंद्र मोरे (संस्थापक अध्यक्ष), श्री.प्रशांत नांदगावकर, (उपाध्यक्ष), श्री.विकास पाटिल (उपाध्यक्ष), श्री.शरदचंद्र जाधव (महासचिव), श्री.मनिष व्हटकर (खजिनदार), श्री.विजय शिंदे (पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख), श्री.महेश्वर तेटांबे (संचालक), श्री.किशोर केदार (संचालक) अँड.मनिष व्हटकर (संचालक), ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश साळगांवकर तसेच कार्यालयीन प्रमुख श्री.रुपेश शिरोळे.आदी मान्यवर उपस्थित होते.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने