पुणे: पुणे सोलापूर महामार्गावरील इंदापूर बाह्यवळणावर मखरे सर्कल या ठिकाणी एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका वृध्दाचा मृत्यू झाला आहे.शुक्रवारी दि.07 जानेवारी रोजी सकाळी 09 वाजण्याच्या पूर्वी हा अपघात झाला. प्रल्हाद सोपान खामगळ रा.वडापुरी (रामवाडी) ता.इंदापुर जि.पुणे असं मयत वृध्दाचे नांव आहे.
याबाबात इंदापूर पोलिस ठाण्यात मयताचे भाऊ बाळासाहेब सोपान खामगळ रा.वडापुरी रामवाडी ता.इंदापुर यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकअज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरुध्द कलम 304 अ, 279, 337,338 मोटारवाहन कायदा कलम 184, 134/177 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रल्हाद सोपान खामगळ यांस पायी चालत जात असताना कोणत्यातरी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील वाहनाने पाठीमागुन ठोस दिली. यात प्रल्हाद खामगळ यांच्या डोक्यास, हातास, पायास किरकोळ व गंभीर दुखापती झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.पुढील तपास पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.निरीक्षक अपर्ना जाधव हे करीत आहेत.
Tags
news
