पुणे :राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की ,'देशात व महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट सध्या येऊन ठेपली आहे. यासाठी आपण सर्वांनी आपली काटेकोरपणे काळजी घेतली पाहिजे. मी देखील काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आलो होतो परंतु न घाबरता या गोष्टीला आपण सामोरे गेलो पाहिजे. जर आपल्याला कोरडा खोकला, तापआला, अंग दुखू लागले, बारीक ताप आला, सर्दी झाली असेल, कणकणी आली असेल तर आपण अंगावर न काढता तात्काळ आपण आपली रॅपिड टेस्ट करावी रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर आरटीपीसीआर करावयाची आवश्यकता नसून ताबडतोब यावर आपण उपचार घ्यावेत.
ओमिक्रॉन सौम्य असला तरी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तिसरी दाट रोखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. पहिल्या व दुसऱ्या कोरोना लाटेत आपल्या जवळचे सहकारी आपल्यातून गेले आहेत. शक्यतो घरीच थांबावे, अनावश्यक गर्दी करू नये, शासनाचे नियम पाळावेत, आपले, आपल्या समाजाचे, मतदारसंघाचे आरोग्य उत्तम ठेवावे असे आवाहन राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
Tags
news
