पुणे: सणसरचे माजी पोलीस पाटील व प्रगतशील बागायतदार नामांकित मल्लराजेंद्र विनायकराव निंबाळकर यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले असून चार दिवसापूर्वी धाकट्या भावाच्या निधनानंतर त्यांचे निधन झाल्याने निंबाळकर कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर निर्माण झाला आहे.निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहत दुःख व्यक्त केले तसेच निंबाळकर कुटुंबाविषयी त्यांनी हळहळ व्यक्त केली.
पै.राजा बापू यांचा सणसर मधील विविध सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यात मोठा सहभाग होता. त्यांचे व्यक्तिमत्व मोठे होते होते. चार दिवसापूर्वी त्यांचे लहान बंधू सणसर गावचे माजी उपसरपंच जगदीश निंबाळकर यांचे निधन झाले होते. संपूर्ण कुटुंब या दुःखातून सावरत नाही तोपर्यंतच त्यांच्या मोठ्या भावाचे हृदयविकाराने निधन झाल्याने सणसरच्या निंबाळकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.परिसरातून निंबाळकर कुटुंबाविषयी हळहळ व्यक्त केली जात आहे.
राजवर्धन पाटील यांनी या कुटुंबाचे सांत्वन केले तसेच या कुटुंबाला या संकटातून सावरण्याची परमेश्वराने शक्ती देवो अशी त्यांनी यावेळी प्रार्थना केली.
Tags
news
