पुणे:वालचंदनगर कडून जंक्शनकडे निघालेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीने दुचाकीस पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. डाळज ते कळंब मार्गावर घडली आहे.घनशाम देवकीनंदन भाटीया वय ५१ वर्षे रा.जंक्शन ता.इंदापूर जि.पुणे आणि आशा घनशाम भाटीया वय ४६ वर्षे असे मयत पती पत्नीची नांवे आहेत.
महामार्ग पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दि.०४ जानेवारी रोजी दुपारी ०३ च्या सुमारास डाळज जंक्शन रोडवर वालचंदनगर कडून जंक्शन मार्गे दोन रिकाम्या ट्राॅली जोडून निघालेल्या ट्रॅक्टर वरील चालकाचा ताबा सुटल्याने याच मार्गावरून निघालेल्या दुचाकीस ( वाहन नंबर एम.एच.४२ ए.क्यू.३१०८) हीस पाठीमागून धडक देऊन अपघात झाला.यामध्ये दुचाकीवरील घनशाम देवकीनंदन भाटीया वय ५१ वर्षे रा.जंक्शन ता.इंदापूर जि.पुणे आणि आशा घनशाम भाटीया यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
सदरील घटना समजताच महामार्ग पोलिस मदत केंद्र इंदापूरचे पोलीस उप निरीक्षक धर्मपाल सांगळे, सहा.पो.उप. निरीक्षक महावीर कांबळे, वसंत कदम, नावनाथ कदम व वालचनांगर पोलिस ठाण्याचे विनोद पवार घटनास्थळी धाव घेतली.
Tags
news
