पुणे: इंदापूर तालुक्यातील प्रसिद्ध वकील अॅङ केकान आपल्या कामासाठी बारामती येथे जात असताना इंदापूर- भिगवण मार्गावर बारामती येथे जगदंबा नगर या माळावर ती एका झाडाखाली दुखापत झालेले हरिण त्यांना दिसले.
एक माणुसकीचा धर्म म्हणून केकान यांनी त्या हरणाच्या पिल्लाला कुठलाही विचार न करता मागच्या सीटवर ती टाकून त्याला उपचारासाठी बारामती येथे नेण्यात आले. ही गोष्ट समजताच आनंद केकान यांचे प्राणी मित्रांनी व सर्वच सामाजिक स्तरातुन कौतुक केले .गेल्या आठवड्यापासून हरणाच्या अपघाताची ही दुसरी घटना असून दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एका हरणाच्या मृत्यू ही झालेले समोर आले आहे
Tags
news
