पुणे:इंदापूर तालुक्यातील बोरी गावात तालुक्याला हादरवून सोडणारी घटना घडली आहे. नववीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीने बुधवारी दि.12 जानेवारी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे .या घटनेने बोरी गाव हादरले आहे.सिद्धी गजानन बिटे रा.बोरी ता.इंदापूर असे अल्पवयीन मुलीचे नाव आहे.
सिध्दी ही बोरी गावातील हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकत होती. गावातील मुलांच्या छेडछाडीमुळे कंटाळून या अल्पवयीन मुलीने आपले आत्महत्त्या करुन आपले आयुष्य संपवले असल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.सिध्दीने आत्महत्तेपूर्वी एक चिठ्ठी लिहून आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.आई वडिलांच्या प्रतिमेस धक्का लागू नये म्हणून मी आत्महत्या करत असून ‘आब्या’ मुळे आत्महत्या करत असल्याचे तिने चिठ्ठीत नमूद केले होते. ही चिठ्ठी पोलिसांना व नागरिकांना मिळाली. गावातील तीन मुले या मुलीची छेडछाड करत होती अशी माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तिघा मुलांविरोधात गुन्हा दाखल केला.गुन्ह्याचा पुढील तपास फौजदार नितीन लकडे करत आहेत.
Tags
news
