हतगड- प्रतिनिधी-
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच नेहरु युवा मंडळ, शिलोडा ता. जि. अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिन युवा सप्ताहाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला येथे करण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, स्व. वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे राष्ट्रीय युवा दिन निमित्त स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला गणेश कुळकर्णी, तालुका क्रीडा अधिकारी जिल्हा युवा पुरस्कारार्थी नाजिया खान, रोहण बुंदेले व दिनकर उजळे, क्रीडा अधिकारी, चारुदत्त नाकट यांच्या हस्ते उपस्थितीमध्ये हार अर्पन करण्यात आले. सदर कार्यक्रमाकरीता जिल्हा समन्वयक महेशसिंगजि शेखावत, उदय देशमुख हे मंचावर उपस्थित होते. तसेच मंचावर उपस्थित अतिथी व जिल्हा युवा पुरस्कारार्थी नेहरु युवा मंडळ शिलोडा, ता. जि. अकोला चे संचालक नाजिया टि खान, रोहण बुंदेले यांनी यावेळी स्वामी विवेकानंद यांचे युवकांबद्दलचे विचार व्यक्त केले. सर्व पुरस्कारार्थी व अतिथींचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रस्तावना दिनकर उजळे क्रीडा अधिकारी यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन लक्षमीशंकर यादव राज्य क्रीडा मार्गदर्शक यांनी केले. सदर कार्यक्रमाकरीता नेहरु युवा मंडळ, शिलोडा ता.जि. अकोला यांचे २५ युवती उपस्थित होते
सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला चे क्रीडा अधिकारी चारुदत्त नाकट, राज्य क्रीडा मार्गदर्शक सतिशचंद्र भट, कनिष्ठ लिपीक महेश पवार, दिपक व्यवहारे, प्रशांत खापरकर, राजू उगवेकर, निशांत वानखडे, श्री अजिंक्य धेवडे, गजानन चाटसे, विक्रम काळे, अनिल ढेंगाळे व आदिनीं परिश्रम घेतले .
Tags
news
