शिरपूर शहर पोलीस ठाणे येथील उत्कृष्ट पोलीस अंमलदार यांचा गुणगौरव



शिरपूर - शिरपूर शहर पोलीस ठाणे येथे उत्कृष्ट पोलीस हवालदार यांच्या गुणगौरव कार्यक्रम दिनांक 26 जानेवारी रोजी संपन्न झाला.
मा. पोलीस अधिक्षक श्री. प्रविणकुमार पाटील यांचे संकल्पनेतून व मा. अपर पोलीस अधिक्षक श्री प्रशांत बच्छाव, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल माने यांचे मार्गदर्शनातून शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथील पोलीसांचे कामाचा दर्जा उंचाविण्यासाठी दर महिन्यातील उत्कृष्ट कामगीरी करणारे पोलीस अंमलदार यांचा गुणगौरव व उत्कृष्ट कामगीरी करण्यास प्रोत्साहन देणा-या संकल्पनेतून शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र देशमुख यांनी २६ जानेवारी २०२२ रोजी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल माने यांचे प्रमुख उपस्थित थापालीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी प्रलंबित गुन्ह्याची तात्काळ निर्गती करणे, मालाविरुध्दचे गुन्ह उघडकीस आणणे, फरार व पाहिजे असलेले आरोपी पकडणे तसेच दोषसिध्दीसाठी कशल तपास करून उत्कृष्ट कामगीरी अशी सोपविलेली जबाबदारी अतिशय प्रमाणिकपणे व श्रमाने उत्कृष्ट पार पाडले अशांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रमात प्रथम पारितोषिक पोहेकॉ नारायण मालचे यांना देवून त्यांचा गौरव करण्यात आला.

तसेच यावेळी शहर पोलीस ठाण्यातील विशेष कामगिरी करणारे पो.उ.नि. संदिप मुरकडे, असई नारायण पाटील, रामकृष्ण मोरे, पोहेकों लादुराम चौधरी, ललित पाटील, पोना तुकाराम गवळी, भरत चव्हाण, हेमंत पाटील, पोकॉ/ गोविंद कोळी, विनोद आखडमल, प्रविण गोसावि, मनोज दाभाई, अनिल अहिरे व मपोकां/ स्वाती शहा अशांना बक्षीस देवून त्यांचा गुणगौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे वेळी पोलीस अंमलदार यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून त्यात त्यांनी गुणांना बाव मिळून त्यांचेतील प्रतिभा व सुप्त गुण जागृत करणारा कार्यक्रम आज पोलीस स्टेशनला • राबविण्यात आला त्यातून भविष्यात चांगली कामगिरी करून बक्षिस मिळविण्याचा संकल्प केला आहे त्याबद्दल धुळे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचे मनापासून आभार मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने