तलवारीचा धाक दाखवत डॉक्टर च्या घरात चोरी



इगतपुरी - घोटी शहरातील श्रीरामवाडी येथील रहिवासी संकुलात रविवारी रात्री २ ते ३ वाजेदरम्यान घोटीतील बालरोगतज्ञ डॉ. सुनील बुळे यांच्या घरात घुसत तलवारीचा धाक दाखवत २ चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने मिळून अंदाजे 3 लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. घटनेच्या वेळी डॉ. बुळे नेमके स्वत:च्या हॉस्पिटलला अत्यावश्यक रुग्ण तपासण्यासाठी घराला बाहेरून कुलूप लावून गेले होते. डॉ. सविता बुळे घरात एकट्याच होत्या. चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कोंडा तोडून आत प्रवेश केला. तलवारीचा धाक दाखवत डॉ. सविता यांना कोणतीही इजा न करता मुद्देमाल घेऊन पसार झाले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घोटी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असून पुढील तपास घोटी पोलिस करत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने