*रोटरी स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा* दोडाईचा (अख्तर शाह)




दोंडाईचा येथील श्रीमती बसंतीबाई पाबुदानजी संचेती प्री-प्रायमरी रोटरी इंग्लिश स्कूल व श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूल येथे नियामाचे पालन करत प्रजासत्ताक दिन
साजरा करण्यात आलेल्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण रोटरी क्लब दोंडाईचा सिनिअर्सचे अध्यक्ष श्री.राजेश माखिजा  यांच्या हस्ते करण्यात आले. 
  याप्रसंगी ऑनलाईन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . यात कु.हर्षिता जाधव,कु.प्राची गिरासे.कु.श्रेया माळी,कु.विरती जैन कु.खुशी माळी यांनी ' देश मेरे ', ' तेरी मिट्टी ' ही देशभक्तीपर गीते सादर केलीत.  कु. सिद्धी गिरासे,कु श्रेया माळी,गितेश पाटील यांनी
२६ जानेवारी हे देशभक्तांच्या आत्मबलाचे, त्यागाचे, आत्मसन्मानाचे,देशप्रेमाचे पर्व आहे.जगातील सर्वात प्रदीर्घ लिखित राज्यघटना असणारा लोकशाहीप्रधान देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. २६ जानेवारी  १९५० हा दिवस भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. संविधानाने भारतीय नागरिकांना आपले हक्क प्रदान करत असताना कर्तव्याची जाणीव करून दिली आहे.  प्रत्येक नागरिकांत राष्ट्रभक्ती असली पाहिजे, लोकशाही मूल्यानुसार आचरण असले पाहिजे. पूर्वजांनी स्वातंत्र्य प्रदान करून लोकशाहीची फळे चाखायला दिली आहेत. ती पुढच्या पिढीकडे सुपूर्द करायची असतील तर प्रत्येकाला जागरूक राहावे लागेल. अशा शब्दांत आपले विचार व्यक्त केलेत.
           ध्वजारोहणाचे प्रमुख पाहुणे श्री. राजेश माखिजा यांनी २६ जानेवारी हा भारतीयांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. देशाचा राष्ट्रीय सण हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस असतो. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरी खऱ्या अर्थाने लोकशाली शासनप्रणालीची सुरुवात 26 जानेवारी 1950 पासून झाली.असे मत प्रतिपादन केले
       या कार्यक्रमाचे यु ट्युब लाईव्ह स्ट्रीमिंग द्वारे प्रक्षेपण करण्यात आले.याला विद्यार्थी व पालकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
         या राष्ट्रीय सणाला शाळेचे अध्यक्ष श्री. हिमांशु शाह, डॉ.मुकुंद सोहोनी,श्री. पी.सी. शिंदे, प्राचार्य श्री. एम. पी. पवार,इंचार्ज बतुल बोहरी, रो. नितीन अयाचित ,रो डॉ. राजेंद्र गुजराथी, रो.श्रीकांत श्रॉफ, रो.राकेश जयस्वाल,रो.के.टी. ठाकूर, रो. जवाहर केसवाणी व शिक्षक उपस्थित होते.
       हा समारंभ  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशांचे व सूचनांचे पालन करून संपन्न झाला. कार्यक्रमाचे यु ट्युब लाईव्ह स्ट्रीमिंग संगणक शिक्षक श्री प्रशांत जाधव यांनी केले. तर सूत्रसंचालन सौ.सुवर्णा महाजन यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने