पंजाब काँग्रेस सरकारचा शिरपूर भाजपाने केला निषेध पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षिततेसाठी घातले देवाला साकडे साईबाबा मंदीरात प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते पुजन केले



      शिरपूर : भारतीय जनता पार्टी शिरपूर शहर व तालुका तर्फे (दि.७ जानेवारी) रोजी येथील मार्केट कमेटी येथे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्यास मार्ल्यापण करुन साईबाबा मंदीरात भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत यांचा हस्ते विधिवत पूजन करण्यात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुक्षिततेसाठी व सुदृढ आरोग्यासाठी साकडे घालण्यात आले. येथेच निदर्शने आंदोलन करुन पंजाब सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी शिरपूर कृउबा समिती सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, धुळे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, चिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, तालुका सरचिटणीस मंगेश भदाणे, जितेंद्र सुर्यवंशी, संजय आसापुरे, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, मुकेश पाटील, अविनाश शिंपी, भालेराव माळी, राज सिसोदिया, प्रमोद भोंगे, बापु पाटील, योगेंद्रसिंग सिसोदिया, अनिल बोरसे, राजुलाल मारवाडी, जयसिंग राजपुत, सुर्यकांत पाटील आदि उपस्थिती होती. यावेळी बबनराव चौधरी म्हणाले की, पंजाबात शेतकऱ्यांनी सुरक्षा कवच तोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रस्ता रोखला. आंदोलक शेतकऱ्यांनी विरोधाची भूमिका घेतल्याने मोदींना फिरोजपुर यातील रॅली रद्द करावी लागली. सुदैवाने अनुचित प्रकार घडला नाही. या प्रकारास पंजाब सरकार दोषी आहे. पंतप्रधान मोदींवर हा एक प्रकारे हल्लाच होता. त्यामुळे भाजपा पंजाब सरकारचा व काँग्रेसचा तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक विचार आहे. त्यांच्या नेतृत्वात देश प्रगतीच करीत आहे. जागतिक पातळीवर मोदींनी नावलौकिक मिळविले असून सम्पूर्ण जगाला त्यांची गरज आहे. म्हणून त्यांच्या सुरक्षिततेसाठी व सुदृढ आरोग्यासाठी साईबाबा मंदीरात पूजन करण्यात येऊन देवाला साकडे घालण्यात आले. ते पुढे म्हाणाले की, पंजाबमधील काँग्रेस सरकारने देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेशी केलेली तडजोड निषेधार्ह आहे. विकासकामांचे उदघाटन व जनसभेला संबोधित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी फिरोजपुर, पंजाबला जाणार होते. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर प्रवास रद्द करून दुसऱ्या राखीव पर्यायी मार्गावरून बायरोड जायला निघाले असता काही आंदोलकांनी रस्ता ब्लॉक केला. पंतप्रधानांची गाडी १५-२० मिनिटे एका पुलावर अडकून पडली होती. पंतप्रधानांच्या प्रवासी मार्गाबद्दल फक्त एसपीजी टीम आणि पंजाब पोलिसांना माहिती होती ही माहिती आंदोलकांना कोणी दिली? हे कमी होत म्हणून की काय घटनास्थळावरून पंतप्रधानांच्या सुरक्षा रक्षकांनी पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला तेव्हा त्यांना आवश्यक सहकार्य व प्रतिसाद सुद्धा मिळाला नाही. भारत - पाकिस्तान सीमेपासून १० किमी अंतरावर पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेशी तडजोड करून पंजाब काँग्रेसने राजकारणाची न्यूनतम पातळी गाठली आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेशी अक्षम्य तडजोड करणाऱ्या पंजाब काँग्रेस सरकारचा तीव्र निषेध करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने