तालुक्यातील वाडी येथे एकाच रात्रीतून चोरट्यांनी 7 दुकाने फोडत रोकडसह दुचाकी व बिअचे बॉक्स केले लंपास ग्रामीण भागात चोरट्यांचा हौदोस,सीसीटीव्हीत झाले कैद





शिरपुर तालुक्यातील वाडी येथे अज्ञात चोरट्यांनी बिअर शॉपिसह पान टपऱ्या व दुकाने फोडत हजारो रुपये लंपास करीत एक दुचाकीसह बिअर बॉक्स चोरून नेल्याची घटना गुरुवार 6 जानेवारी 2022 रोजी सकाळी उघडकीस आली आहे.यापूर्वी देखील अशीच चोरीची घटना तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोराडी येथे देखील 30 डिसेंबर  2021 रोजी उघडकीस आली होती.त्यामुळे वाडी गावात चोरीची घटना उघडकीस आल्याने गावासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आहे.शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल केली नसल्याने गेलेल्या मुद्देमलाबाबत अधिकृत आंकडेवारी समजू शकली नाही.सदर घटना ही पहाटे 2 ते 3 वाजेचया सुमारास घडली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.शिरपूर तालुक्यातील वाडी येथे मध्यरात्री काही अज्ञात चोरट्यांनी दिनेश बुट हाऊस, प्रिन्स बियर शॉप,बालाजी किराणा दुकान सतगुरू पान सेंटर,शिवनेरी रेडीमेड कापड दुकान,सद्गुरू पान सेंटर,शिवनेरी फोटो स्टुडिओ या दुकाने फोडून अंदाजे 17 ते 18 हजाराची रोकड सह काही मुद्देमाल देखील चोरून नेल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले.तसेच बिअर शॉपिंमधून काही बिअरचे 12 बॉक्स व गावातील देविदास वाघ याच्या   घरासमोर अंगणात उभी केलेली जीजे 19 ई 756 क्रमाकांची दुचाकी देखील अज्ञातांनी लंपास केली आहे.चोरीची घटना उघडकीस आल्याने शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जी डी पावरा,गणेश सोनवणे,पोना राजेंद्र एंडाइत, पोकॉ पावरा,अनिल अहिरे यांच्यासह पोलीस पथकाने धाव घेत पाहणी करीत सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असून फुटेज मध्ये चोरटे कैद झाले आहेत. याप्रकरणी रात्रीं उशिरापर्यंत तक्रार दाखल केली नसल्याने गुन्हा नोंद करण्यात आला नाही.शहराकडून चोरट्यांनी ग्रामीण भागाकडे मोर्चा वळविल्याने व 5-6 दिवसातच दोन गावात दुकाने फोडून लूट केल्याने दुकानदारामध्ये व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पोलिसांनी त्वरित चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने