भिरडाई येथे श्री.सच्चीदानंद राष्ट्रसंत श्रीपाद बाबा पुण्यतिथी निमित्त वैष्णव मेळावा संपन्न*




भिरडाई,भिरडाने, मुकटी परिसरातील श्री.सच्चीदानंद राष्ट्रसंत श्रीपाद बाबा आंनदाश्रम चॅरिटेबल ट्रस्ट येथे राष्ट्रसंत श्रीपाद बाबांच्या पुण्यतिथी निमित्त तीनदिवसीय श्री,वैष्णव मेळावा संपन्न झाला, या मेळाव्याला ह.भ.प.गुरुवर्य धनराज महाराज कोळपिंप्री ह.भ.प.गुरुवर्य रावसाहेब महाराज मुकटी,ह.भ.प.वंदनाताई महाराज चिमठाणे यांचे मार्गदर्शन लाभले,या मेळाव्याचे उद्धघाटन शिवसेना सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी यांच्या शुभहस्ते झाले,या तीन दिवसीय वैष्णव मेळाव्यात अनेक महात्मे व कीर्तनकारांचे कीर्तने प्रवचने झालीत,यात ह.भ.प.प्रल्हाद महाराज पिंपरखेड,ह.भ.प.रावसाहेब महाराज मुकटी, ह.भ.प.गुरुवर्य धनराज महाराज कोळपिंप्री,यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली,दिन दिवसीय वैष्णव मेळाव्यात सकाळी काकड आरती,कीर्तने,प्रवचने ,हरिपाठ,पालखी सोहळा,अशा कार्यक्रमांनी या आंनदाश्रमात धार्मिक चैतन्य प्राप्त झाले होते,या मेळाव्याला धुळे जिल्ह्यातील विविध स्तरांवरील मान्यवरांची उपस्थिती लाभली,तसेच या कार्यक्रमात ह.भ.प.विठ्ठल महाराज,ह.भ.प.दीपक साळुंके,ह.भ.प.भरत साळुंके,ह.भ.प. सुकलाल माळी, ह.भ.प.हर्षल साळुंके, ह.भ.प.संदीप पाटील,ह.भ.प.गणेश चौधरी,यांच्यासह मुकटी, भिरडाई, भिरडाने,परिसरातील व जिल्हाभरातील साधक स्नेही परिवाराचे सहकार्य लाभले,

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने