पत्रकारांमुळे माझा लढा जिवंत: सुशिलकुमार पावरा* *मिडीयाचे लक्ष,प्रशासनाचे दुर्लक्ष* *सुशिलकुमार पावरा यांचे 18 व्या दिवशीही उपोषण सुरूच*




 दापोली  :पत्रकारांमुळे माझा लढा अजूनही जिवंत आहे, अशी प्रतिक्रिया उपोषणकर्ते शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी व्यक्त केली आहे. आपल्या न्याय मागण्यासाठी जिल्हा परिषद आदर्श शाळा सुकदरचे शिक्षक   सुशिलकुमार पावरा यांचे गेल्या 18 दिवसांपासून दापोली येथे  सातत्याने  उपोषण सुरूच आहे. बोगस अपंग प्रमाणपत्रधारी,दोषी विजय  दाजी बाईत तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली व बोगस डिग्री धारक व दोषी श्री.नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली या दोन्ही बोगस विस्तार अधिका-यांना सेवेतून बडतर्फ करा,एकनाथ आंबोकर यांच्या वर कारवाई करा व माझी उर्वरीत 2 मूळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करा तसेच 28 मागण्यांच्या तात्काळ पूर्तता करा .या मागणीसाठी    सुशिलकुमार पावरा यांचे उपोषण करत आहेत. 
           आज माझे 188 वे उपोषण सुरू आहे. उपोषण करताना मला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. तरीही मी माझा न्यायीक लढा सुरूच ठेवला आहे. या माझ्या न्यायिक लढ्यात मला पत्रकारांचे चांगले सहकार्य मिळाले आहे.कारण त्यांनी निर्भीड पणे माझी बाजू वृत्तपत्रातील बातम्यांद्वारे व टिव्ही चॅनेल,  ऑनलाईन न्यूज चॅनेल द्वारे लोकांसमोर पोहचवली आहे. माझ्या प्रकरणाचे सत्य लोकांसमोर आणले आहे. दररोज वृत्तपत्रात व ऑनलाईन न्यूज चॅनेल वर माझ्या उपोषणाच्या व प्रकरणाच्या बातम्या येत आहेत.  वृत्तपत्रातील बातम्या व टिव्ही चॅनेल वरील बातम्यांचा परिणाम होऊन मला मध्यंतरी थोडा न्याय मिळाला होता. जिल्हा परिषद रत्नागिरीतील अधिका-यांनी दडपलेली माझी 8 पैकी 6 मूळ कागदपत्रे मला दिनांक 7 जून 2017 रोजी  रात्री 11.00 वाजता देण्यात आली. ही कागदपत्रे अनुसूचित जमाती कल्याण समिती महाराष्ट्र राज्य रत्नागिरी दौ-यावर आली असता त्यांच्या आदेशानुसार  देण्यात आली.
           जिल्हा परिषद आदर्श शाळा    सुकदर या  शाळेत हजर सुद्धा झालो.तेथे उत्कृष्ट अध्यापन केल्याबद्दल व 4 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळवून दिल्याबद्दल  मला राष्ट्रीय कला मित्र पुरस्कार सुद्धा देण्यात आला आहे. मात्र त्याच शाळेत माझ्याविरोधात षडयंत्र रचण्यात आले. खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले.माझ्या विरोधातले षडयंत्र व कट वृत्तपत्रातील बातम्यांद्वारे लोकांसमोर आलेच आहे. संबंधित विस्तार  अधिकारी दोषी ठरले. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. अद्याप माझी उर्वरित 2 कागदपत्रांसाठी व जिल्हा परिषद रत्नागिरीला झालेला 2 लाख दंडाच्या रकमेसाठी लढा सुरूच ठेवला आहे. मला अखेर न्याय मिळेल, अशी आशा आहे.  माझ्या लढ्यात पत्रकारांचे चांगले सहकार्य मिळाले व मिळत आहे. म्हणून मी हा लढा आजही जिवंत ठेवला आहे. अशी प्रतिक्रिया उपोषण कर्ते शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी व्यक्त केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने