न्यु खान्देश मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निर्भीड पत्रकार अख्तर शहा यांची निवड




*दोंडाईचा-*  येथे आज पत्रकार सुष्टीचे जनक दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जंयतीनिमित्त प्रतिमा पुजन व नुतन कार्यकारिणी निवडीची बैठक घेण्यात आली. त्यात सर्वानुमते एन.टी.न्युज व दैनिक पथदर्थी चे  पत्रकार व निर्भीड विचार न्यूज या ऑनलाईन पत्रिकेचे दोंडाईचा शहर प्रतिनिधी अख्तर शहा यांची सर्वानुमते बिनविरोध अध्यक्षपदावर निवड करण्यात आली आहे.

आहिल्याबाई शाँपींग समोरील शासकीय रेस्ट हाऊस येथे झालेल्या बैठकीत सुरूवातीला पत्रकार सुष्टीचे जनक,दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे छोटेखानी कार्यक्रमात प्रतिमा पुजन करण्यात आले. यावेळी जमलेल्या सर्व पत्रकार बंधुनी  अख्तर शहा यांची न्यु खान्देश मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदाच्या निवडीची घोषणा केली.उर्वरित कार्यकारिणी शुक्रवार रोजी आयोजित केलेल्या बैठकीत केली जाणार आहे.
न्यू खान्देश मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अख्तर शहा यांची निवड जाहीर झाल्याने दोंडाईचा  शहर व परिसरातून पत्रकार बांधव तसेच सामाजिक व राजकीय स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे .
एक धडाडीचा पत्रकार व पत्रकारितेतील त्यांची निर्भीडता व रोखठोक लिखाण त्यांच्यातले असलेली जिद्द व पत्रकारांनी विषयी असलेली जाणीव व कृतज्ञता इत्यादी सर्व कलागुण पत्रकार अख्तर शहा यांच्या अंगी असल्याने व सर्वच पत्रकार मित्रांशी त्यांचे ऋणानुबंधाचे संबंध असल्याने परिसरातील सर्व पत्रकार मित्रांनी त्यांची अध्यक्ष पदावर बिनविरोध निवड जाहीर केले आहे व सदरच्या निवडीनंतर त्यांनी पत्रकारांच्या विविध समस्या व न्याय हक्कांसाठी आपण शासन दरबारी लढा देऊन पत्रकारांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू अशी आशा व्यक्त केली आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने