मन की बात उत्तर महाराष्ट्र विभाग कार्यक्रम संयोजकपदी बबनराव चौधरी




  शिरपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिव्हाळ्याचा उपक्रम 'मन की बात' या कार्यक्रमाचा उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजकपदी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आलेली आहे. यापुढे आता मन की बात हा कार्यक्रम सर्वच बुथ वर व्हावा यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांचा मार्गदर्शनाखाली प्रदेश समितीने हा निर्णय घेतला आहे. मन की बात हा कार्यक्रम सर्व बुथवर घेण्याकरीता विभागातील सक्षम व वेळ देणारा पदाधिकारी म्हणुन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मन की बात कार्यक्रम प्रदेश प्रभारी तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड मुंबई यांनी बबनराव चौधरी यांची नियुक्ती जाहिर केलेली आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव ग्रामिण, जळगाव महानगर, धुळे ग्रामिण, धुळे महानगर व नंदुरबार जिल्हा या विभागासाठी हि नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापुर्वी हि बबनराव चौधरी यांच्यावर या विभागाची बुथ रचनाची जबाबदारी पक्ष नेत्यांनी सोपवली होती त्यांनी बुथ रचनाचे अतिश्य उत्कृट असे काम केलेले आहे. त्यामुळेच विधानसभा विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांचा मार्गदर्शनाखाली मन की बात कार्यक्रम प्रदेश प्रभारी तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड मुंबई यांनी बबनराव चौधरी यांचावर आता परत या विभागाची मन की बात कार्यक्रम विभाग संयोजक म्हणुन जबाबदारी टाकली आहे. उत्तर महाराष्ट्र भाजपा संघटनमंत्री रविंद्र अनासपुरे व सर्वच जिल्हाध्यक्ष यांचाशी बबनराव चौधरी यांनी चर्चा करुन जळगाव ग्रामिण, जळगाव महानगर, धुळे ग्रामिण, धुळे महानगर व नंदुरबार जिल्हासाठी संयोजक व सहसंयोजक लागलीच नियुक्त केले आहेत. 'मन की बात' या कार्यक्रमाचा उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजकपदी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांची नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने