इंदापुर- मोर्य क्रांती संघ या सामाजिक संघटनेच्या इंदापूर शहराध्यक्षपदी प्रकाश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे नियम अटी अधीन राहून संघटन वाढविण्याची जबाबदारी देण्यात आली असून पवार यांचे बीएमपी च्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असून जनतेच्या अडचणीत सक्रिय सहभाग घेऊन प्रश्न मिटविण्यात आग्रही असतात म्हणुन ही निवड सार्थ आहे.
बीएमपीचे राष्ट्रीय महासचिव ॲड.राहुल मखरे यांच्या संकल्पनेतून व मोर्य क्रांती संघ प्रदेशाध्यक्ष चंद्रसेन लहाडे, प्रताप दादा पाटील महासचिव मौर्य क्रांति संघ महाराष्ट्र राज्य, यांच्या आदेशानुसार व बलभीम मथिले प्रभारी मौर्य क्रांती संघ महाराष्ट्र राज्य, राहुल शिंगाडे प्रदेश संघटक मोर्य क्रांती संघ महाराष्ट्र राज्य, यांच्या कल्पनेतून प्रकाश पवार यांची एकमताने निवड करण्यात आली.
मोर्य क्रांती संघाने निर्धारित केलेल्या नितीनियम व अनुशासनांत राहून काम करणार असून कोणत्याही प्रकारचे निर्णय घेताना राज्य व जिल्हा कार्यालयाची मान्यता घेणार असल्याचे प्रकाश पवार यांनी सांगितले. या निवडीनंतर विविध ठिकाणांहून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हा कार्यक्रम शोशल डिस्टंन्स ठेवून सॅनिटाझर व मास्क चा वापर करून पार पडला.
Tags
news