*दोंडाईचा येथे भाजपा तर्फे जल्लोष* *आमदार जयकुमार रावल यांच्यासह 12 आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केल्याने दोंडाईचा जिल्हा धुळे येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा , महाविकास आघाडी सरकारच्या निषेध*




दोडाईचा (अख्तर शाह)
पावसाळी अधिवेशनात भारतीय जनता पार्टीच्या वतीने जनतेचे प्रश्न मांडतांना, गोरगरीब जनतेबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा अशी मागणी करतांना आघाडी सरकारने एकूण बारा आमदारांचे निलंबन केले होते, आमदारांचे निलंबन म्हणजे त्या त्या मतदार संघावर अन्याय करण्यात आला होता। आघाडी सरकारच्या या अन्यायकारक निर्णयाला सुप्रीम कोर्टाने रद्द ठरविले , याचा भारतीय जनता पार्टी दोंडाईचा शहराच्या वतीने नुकताच डी.जे.च्या तालावर फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरी करण्यात आला।
यावेळी भाजपाचे दोंडाईचा शहर उपाध्यक्ष माजी नगरसेवक जितेंद्र गिरासे, सरचिटणीस कृष्णा नगराळे, जितेंद्र गिरासे, भरतरी ठाकूर, नगरसेवक किशनभाई दोधेजा, निखिल जाधव, विजय मराठे, नरेंद्र गिरासे, ईश्वर धनगर, सुफियांन तडवी, खलील बागवान, भाजपा युवा मोर्चा दोंडाईचा शहराध्यक्ष राजू धनगर, भाजपा महिला आघाडी प्रमुख शेख इशरतबानो , माजी नगरसेवक संजय पाटील, जमील खाटीक, अनिल सिसोदिया, चंद्रसिंग राजपूत, चतुर पाटील, नरेंद्र ठाकूर, अनिकेत आव्हाड, मयूर राजपूत आदी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने