दोंडाईचात पुन्हा एकदा चोरट्यांचा उछाद; पोलिसांनी लक्ष घालावे... मयुरी ज्वेलर्सची मागील भिंत फोडून चोरट्यांचा डल्ला 3 किलो चांदी लांबवली... तीजोरीतील वीस तोळे सोने तिजोरी न पुटल्याने बालबाल बचावले. दोडाईचा (अख्तर शाह)



दोडाईचा शहरात छोट्या-मोठ्या चोऱ्या, घरफोड्या यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून  दि. २७ रात्री अज्ञात चोरट्याने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या रस्त्यावर शॉपिंग कॉप्लेस मधील मयुरी ज्वेलर्स आहे. दुकानाच्या मागच्या बाजूस जुने शासकीय रुग्णालयाची पडकी इमारत आहे. त्याचा फायदा घेत त्यांनी मागील बाजूच्या भिंत फोडून दुकानाच्या आत प्रवेश केला  दुकानातील तीन किलो चांदीसह इमिटेशन ज्वेलरी घेत पसार झाले. त्यांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तिजोरी न फुटल्याने २० तोळे सोने बालबाल बचावले त्यामुळे पुढील अनर्थ टळला. याबाबत ता २८ रोजी सकाळी मयुरी ज्वेलर्सच्या दुकान मालक यांना दुकानाच्या नावाच्या फलकावरून मोबाईल क्रमांक मिळवत दुकान फुटल्याची माहिती मिळाली मयुरी ज्वेलर्स चे मालक  नंददकिशोर सीताराम सोनार (रा. दोंडाईचा) यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली याबाबत उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. दरम्यान आदल्या दिवशी देखील आव्हाड हॉस्पिटल समोरील खाजगी बंधन बँक कुलुप तोडण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्यात चोरांच्या हाती काही लागले नाही. व एकनाथ दौलत पाटील विखरण ता. शिंदखेडा येथे देखील टोंणगावरकर हॉस्पिटलमध्ये मुलीला प्रसुती निमित्ताने रात्री हॉस्पिटलमध्ये गेल्याचा फायदा घेत तिथे देखील कापूस विकल्याचे पन्नास हजार रुपये व दोन तोळे सोने हे चोरीस गेल्याची माहिती शालक रावसाहेब सुर्यवंशी यांनी देशदूतशी बोलतांना दिली आहे.
सध्या दोंडाईचा शहरात घरफोड्या वाढल्या असून  पोलिसांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने व्यापारी वर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षभरापासून शहरात अनेक घरफोड्या झाल्या असून अपवाद वगळता तपास शून्य असल्याने घरफोडयांचे प्रमाण वाढले असून धाडसही वाढले आहे. तसेच दिवसाढवळ्या मांडळ रोड वरती स्वतंत्र फायन्सस च्या कलेक्शन मॅनेजर ला देखील लुटण्याचा प्रकार समोर आला होता. सर्व घटनेने  व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.. 

चोरीच्या घटना थांबता थांबत नाही आहे; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे...

दोंडाईचा शहरात चोरीच्या घटना थांबता थांबत नसल्याने व्यापारी कॉलनी भागात नेहमी चिंतेचे वातावरण असते सकाळी दुकान, घर व्यवस्थित असेल किंवा नाही याची खात्री दुकानदाराला किंवा घर मालकाला नसते अशी परिस्थिती दोंडाईचा शहराची असून दिवसेंदिवस या प्रकारात वाढ होत असल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरफोडीचे प्रकार वाढत चालले असून दोंडाईचा शहरात पोलिसांविषयी नाराजीचा सूर व्यक्त केला असून तात्काळ बंदोबस्त करावा व रात्रीची गस्त वाढवावी व्यापारी वर्गाकडून होत आहे. या सर्व प्रकाराकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे...

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने