73 व्या गणतंत्र दिवस पाटील वाडा शिरपूर येथे उत्साहात साजरा आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते सैन्य दलातील जवानांचा सन्मान



  शिरपूर - प्रभागक्र ११मध्ये पाटील वाडा खालचे गाव शिरपूर येथे 73 वा गणतंत्र दिवस सालाबादाप्रमाणे उत्साहात साजरा करण्यात आला.
 प्रजासत्ताक  दिवसाच्या निमित्ताने सर्वप्रथम भारतमातेचा प्रतिमेचे  पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन तसेच छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे  पूजन करून  तिरंगा ध्वजारोहणाचा कार्यक्रम भारतीय सैनिक किरण लक्ष्मण सनेर व धीरज मधुकर सनेर, मराठा बटालियन मधील सैनिकांच्या शुभहस्ते करण्यात आले. व मा आमदार, श्री. काशिराम दादा पावरा व  श्री. बबन भाऊ चौधरी यांचा हस्ते भारतीय सैनिकांचा शाल श्रीफळ , फुल गुच्छ देऊन सन्मानित ककरण्यात आले प्रमुख उपस्थिती शिरपूर तालुक्याचे आमदार माननीय श्री काशीराम दादा पावरा तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी नगरपालिकेचे नगरसेवक दादासो.मोहन हुलेसिंग पाटील  पाटील, नगरसेवक हेमंत भाऊ पाटील, नगसेविका सौ. मोनिका रोहित शेटे, नगरसेविका श्नीमती.रंजनाताई सोनवणे , श्री. अमोल भाऊ पाटील, नगरसेवक श्री.किरण दलाल, नगरसेवक श्री. बापु थोरात, शिवसेनेचे श्री रजेसिंग राजपूत राजू टेलर , श्री. भरत भाऊ राजपूत श्री.अरूण बापुधोबी,श्री.  नितीन बाबा राजपूत, श्री.  प्रकाश गुरव श्री.भालेराव माळी ,श्री. संजय चौधरी श्री.राजेंद्र पाटील  श्री. प्रभाकर कोळी, रावसाहेब पाटील पाटील ,वाड्यातील ज्येष्ठ नेते, श्री चंदू नाना पाटील राष्ट्रवादीचे श्री.हेमराज राजपूत, श्री.दिनेश बाबा पाटील, श्री. गुलाब भोई श्रीअविनाश शिंपी श्री.राजु बापू पाटील श्री.सुनील पाटील दैनिक राष्ट्रवादी चे संपादक श्री.रत्नदीप सिसोदिया श्री.संजय आसापुरे श्री विक्की चौधरी ,मुकेश पाटील, महेद पाटील ,श्री. अशोक शेटे मुकेश पाटील  ,अविनाश पवार जगदीश शेटे, पत्रकार महेंद्र सिंग राजपूत या सोबत पाटील वाड्यातील सर्व सन्माननीय ज्येष्ठ मंडळी तसेच महिला भगिनी बालगोपालांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
कार्यक्रम आयोजन, पाटील वाडा मित्र मंडळ व भा ज पा सरचिटणीस रोहित त्र्यंबक शेटे यांनी केले होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने