शिरपूर : अखिल भारतीय कोळी समाज युवक धुळे जिल्हाध्यक्षपदी अजिंक्य रमेश शिरसाठ रा. खामखेडा प्र. था यांची नुकतीच नियुक्ती जाहिर करण्यात आली आहे. त्यांना नियुक्तीपत्र हि प्रदान करण्यात आले आहे. दिल्ली येथील अखिल भारतीय कोळी संघटना महाराष्ट्राही कार्यरत आहे. राज्यातील सर्व जिल्ह्लांमध्ये सक्रीय काम करते. संघटनेचे राष्ट्रीयध्यक्ष खेमचंद कोळी यांच्या आदेशान्वये न महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष शिवप्रसाद भांडे, प्रभारी संजीव शिरसाठ यांच्या सुचनेवरुन व विनायक कोळी, संदीप कुवर, राहुल ईशी यांच्या मार्गदर्शानाखाली शिरपूर तालुक्यातील खामखेडा प्र. था येथील अजिंक्य रमेश शिरसाठ यांची धुळे कोळी समाज युवक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अजिंक्य शिरसाठ हे बांधकाम अभियंता असुन ते शिरपूर शहर रक्तदाता ग्रूप मार्फत तालुका व जिल्ह्लात रक्तसाठा पुरवत असुन कोरोना काळात केलेल्या समाजसेवेची दखल घेत व कोळी समाजाचा विस्तार व संघटन मजबूत करण्यासाठी त्यांची हि नियुक्ती करण्यात आली असल्याचे नियुक्ती पत्रात म्हटले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल कोळी समाज, राजकिय व सामाजिक श्रेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
Tags
news


