पुणे: भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष मारुतीराव धोंडीबा चोपडे यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले.1973 - 1978 कालावधीत त्यांनी छत्रपती सहकारी साखर कारखान्याची अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. सामाजिक व राजकीय कार्याची आवड असल्याने ते सर्वदूर परिचित होते.
मुळचे बारामती तालुक्यातील ढेकळवाडी येथील असणाऱ्या मारुतराव चोपडे यांनी भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये त्यांनी तब्बल चाळीस वर्षे संचालक म्हणून काम पाहत त्यांनी सहकारावर अधिराज्य गाजवले.तर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदा सह निरा कॅनल सोसायटीच्या अध्यक्षपदी व संचालक मंडळांमध्ये ही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यांच्या पाठीमागे पत्नी, पाच मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.
Tags
news
