पुणे: इंदापूर तालुक्यातील वनगळी येथील शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान संचलित एस. बी. पाटील इंजिनीअरिंग महाविद्यालयाच्या ३०० हुन अधिक विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटमधून निवड झाली. यामध्ये इन्फोसिस, कॉग्निझंट, पर्सिस्टंट, कॅपजेमिनी, एमडॉक्स, टीसीएल,बॉश, भारत फोर्ज, वालचंद इंडस्ट्रीज,फोर्ब्स मार्शल, जॉन डिअर,जाबिल सरकिट प्रा. ली., टाटा स्टील, टाटा इलेक्ट्रिकल प्रा. ली.,वेरॉक इंजिनीरिंग ली.,कमिन्स ,लोकेश मशीन ली.,लुकास टी व्ही. एस.प्रा. ली.,अल्मायटी अँसिलरी प्रा. ली., अशा विविध कंपन्यांचा समावेश आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे प्राचार्य डॉ. एस. टी. शिरकांडे यांनी अभिनंदन केले.
प्राचार्य डॉ. एस. टी. शिरकांडे म्हणाले, महाविद्यालयाचा नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार असल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विविध विषयांच्या ट्रेनिंग्ज, तसेच प्लेसमेंटमध्ये महाविद्यालय आघाडीवर आहे. यावर्षीही कॅम्पस प्लेसमेंटची परंपरा जपत अंतिम वर्षांमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचीही नामांकित कंपन्यांत झालेली निवड अभिनंदनीय आहे. विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग’चा विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी फायदा होत असून, महाविद्यालयाच्या ‘इंटर्प्रिनरशिप डेव्हलपमेंट सेल’ अंतर्गतही विद्यार्थ्यांना करिअरच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
विविध शाखांशी निगडित कंपन्या ऑनलाइन प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात आघाडीवर आहेत. कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, सिव्हिल ,इलेक्ट्रिकल या क्षेत्रांत सध्या व्हर्च्युअल मुलाखत आणि फोनवर मुलाखती घेऊन विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट होत आहेत. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर (टीपीओ) प्रा. एस. पी. कांबळे म्हणाले, की 'प्लेसमेंट कोरोना मुळे पूर्णपणे ठप्प झालेल्या नाहीत. कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रांत सध्या व्हर्च्युअल मुलाखती आणि टेलिफोनिक मुलाखती घेऊन प्लेसमेंट होत आहेत. विध्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी कॉलेजमध्ये सॉफ्ट स्किल डेव्हलोपमेंट, फॉरेन लँग्वेज कोर्सेस , एप्टीट्यूड टेस्ट ,मॉक इंटरव्यू असे विविध उपक्रम नेहमी राबिवले जातात.
या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन पाटील साहेब, सचिव मा. भाग्यश्री पाटील ,उपाध्यक्षा मा. अंकिता पाटील आणि विश्वस्थ राजवर्धन पाटील यांनी निवड झालेल्या विध्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर प्रा. एस. पी. कांबळे आणि संपुर्ण टीम यांच्या माध्यमातून प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यात आली.
Tags
news
